होळी व धुलिवंदनसाठी राज्य सरकारची नियमावली जाहीर

मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्युज वृत्तसेवा । होळी आणि धुलिवंदन (रंगपंचमी) साजरी करण्याच्या संदर्भात राज्य सरकारकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. राज्याच्या गृह खात्याकडून ही नियमावली जाहीर करण्यात आली असून त्या संदर्भातील नियमांचे पालन नागरिकांना करावे लागणार आहे.

यंदाच्या वर्षी होळी 17 मार्च रोजी आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 18 मार्च रोजी धुळवड आहे. यंदा धुलवडीच्या दिवशी जबरदस्तीने रंग किंवा पाण्याने भरलेले फुगे मारू नयेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत. या नियमावलीनुसार, रात्री 10 वाजल्यानंतर होळी साजरी करता येणार नाहीये. तसेच डीजे लावण्यासही बंदी घालण्यात आली आहे. सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू आहेत आणि त्यामुळेच डीजे न लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. होळी आणि रंगपंचमी / धुलीवंदन साजरी करत असताना मद्यपान करणाऱ्यांवरही कारवाई केली जाणार आहे.

अशी आहे नियमावली

  • होळी साजरी करताना डीजे लावण्यास बंदी असणार. डीजे लावल्यास कायेदशीर कारवाई होणार.
  • दहावी आणि बारावीच्या परीक्षा सध्या सुरू आहेत आणि त्यामुळे लाऊड स्पीकर जोरजोरात न लावण्याच्या सूचना.
  • धुलीवंदन दिवशी जबरदस्तीने रंग किंवा पाण्याने भरलेले फुगे मारू नयेत.
  • कुठल्याही जाती किंवा धर्माच भावना दुखावल्या जातील अशा घोषणा देऊ नये.
  • रात्री 10 वाजण्याच्या आत होळी करावी.
  • 10 वाजण्याच्या आधी होळी लावणं बंधनकारक असणार आहे. त्यानंतर परवानगी नसणार.

Protected Content