प्रभाग क्र.२ मधील रस्त्यांवर धुळीच्या प्रमाणत वाढ : अग्निशमन बंबद्वारे पाणी मारण्याची नगरसेवक दारकुंडे यांची मागणी

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | प्रभाग क्र. २ मध्ये अमृत योजना व ड्रेनेजचे कामे पूर्ण झाली आहेत. ही कामे करतांना या भागात रस्ते खोदून ठेवण्यात आल्याने रस्त्यांची दुरवस्था झाली असून सर्वत्र धुळीच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. या वाढीव धुळीचे प्रमाण कमी करण्याकरिता या भागात सकाळ-संध्याकाळ रस्त्यांवर अग्निशमन बंबाच्या सहाय्याने पाण्याचा मारा करण्यात यावा अशी मागणी नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी महापौर व मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

 

निवेदनाचा आशय असा की, प्रभाग क्रं. २मधील कंक यांचे घरापासुन ते क्रांती चौक, साळुंखे चौक, शिव मंदीर, मोठी मस्जिद , मस्जिद पाठीमागील भाग, अमर चौक, डी.बी. जैन दवाखान्यापर्यंत या मार्गावर अमृत व ड्रेनेजचे गेल्या २ वर्षापुर्वी कामे झालेली आहेत. त्यामुळे या मार्गावरील सर्व रस्ते खोदुन अत्यंत अवस्था खराब झालेले आहे. यामुळे येथे धुळीचे प्रमाण जास्त झाले असून वरील मार्गावरील नागरीकांनी मागील १ वर्षापूर्वी आंदोलन सुध्दा केले होते. तरी प्रशासनाने येथील रस्त्याचे कामे केलेली नाही. व त्या नागरीकांना प्रशासनाकडुन असे सांगण्यात आले की, आम्ही लवकरात लवकर हया ठिकणच्या रस्त्याचे कामे करून तोपर्यंत वरील मार्गावर सकाळी ९ वाजत २ अग्शिमन गाडी व संध्याकाळ ५ वाजता दोन अग्निशमन बंब याद्वारे पाणी मारण्याची व्यवस्था करु असे आश्वासन दिलेले होते. परंतु महानगरपालिकेने या आश्वासनाचा व वेळोवेळी दिलेल्या पत्राचा सुध्दा विचार केला नाही. आज रोजी मुस्लीम बांधवांचे रोजे व हिंदु बांधवाचे काही सण येत असल्याने लवकरात लवकर रस्त्यांवर पाणी मारण्याची मागणी नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी केली आहे.

Protected Content