मुक्ताईनगरातून दोन तलवारी हस्तगत; दोन जणांवर गुन्हा दाखल

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरात हातात तलवारी घेवून फिरणाऱ्या २ तरुणांवर मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एक संशयित आरोपी अल्पवयीन आहे.

मुक्ताईनगर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरात ९ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास संशयित आरोपी नाना जनार्धन बोदडे (वय-३१) आणि १६ वर्षीय अल्पवयीन मुलगा हे हातात तलवारी घेऊन लोकांमध्ये दहशत निर्माण करत असल्याची  गोपनीय माहिती मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांना मिळाली. त्यानुसार पो.नि. खताळ यांनी पोलीस उपनिरीक्षक शेवाळे यांना सूचना देऊन कारवाईच्या सूचना दिल्या.

दरम्यान पोलिसांनी कारवाई करत संशयित आरोपी नाना बोदडे आणि अल्पवयीन मुलाच्या ताब्यातून एकूण २ तलवारी हस्तगत केल्या. यासंदर्भात पोलीस नाईक असीम तडवी यांच्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात संशयित आरोपी नाना बोदडे आणि अल्पवयीन मुलगा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अविनाश पाटील करीत आहे.

 

Protected Content