नाडगाव ते इच्छापूर रस्त्याचे काँक्रीटीकरण नित्कृष्ट दर्जाचे

बोदवड लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी– येथून जवळच असलेल्या नाडगाव रेल्वे गेट ते इच्छापूर रस्त्याचे राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे पिक्युसी सिमेंट काँक्रीटीकरण केले जात आहे. रस्त्याचे काँक्रीटीकरण नित्कृष्ट दर्जाचे झाले असून एमएसआरडीसीच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनतर्फे रस्त्याच्या खड्ड्यामध्ये वृक्षारोपण आंदोलन करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अंतर्गत करण्यात आलेल्या सेक्शन दोन नाडगाव रेल्वे गेट ते इच्छापूर या निकृष्ट दर्जाच्या पी.क्यू.सी सिमेंट रस्त्याचे काम झाले आहे.या संदर्भात वेळोवेळी संबंधित सरस्वती कन्स्ट्रक्शनच्या ठेकेदार एजन्सी व विभागाकडे तक्रार अर्ज तसेच पुराव्यादाखल फोटो देखील देण्यात आले होते. याकडे सरस्वती कन्स्ट्रक्शन व अन्य विभाग अधिकाऱ्यांनी सोयीस्करपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे. संबंधित ठेकेदाराकडून रस्तेकामाच्या अंदाजपत्रकालाच तिलांजली देण्यात येऊन कामकाज पूर्ण केले आहे. बऱ्याच ठिकाणी रस्ते काम नित्कृष्ट दर्जाचे असल्याने वापरण्यात आलेले स्टील ठिकठीकाणी खड्ड्यातून उघडे पडले आहे. या ठिकाणी असलेल्या भेगांमध्ये डांबर भरण्यात आलेले आहे.सदर रोडच्या दुरूस्त केलेल्या पॅनलचेही दुरवस्था झालेली आहे. ठिकाणी सिमेंट वाहून जाऊन गिट्टी उघडी पडलेली असून बहुतांश ठिकाणी दोन पॅचमध्ये लेव्हल समतल नाही. नित्कृष्ट दर्जाचे रस्तेकामामुळे वाहनचालकांना देखील अनेक अडचणीना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे नाडगाव रेल्वे गेट ते इच्छापूर सेक्शन दोन या निकृष्ट दर्जाच्या पी.क्यू.सी सिमेंट रोडच्या खड्ड्यांमध्ये एमएसआरडीसीच्या निषेधार्थ आज शेतकरी संघटनतर्फे वृक्षारोपण आंदोलन करण्यात आले.

Protected Content