यावल येथे विनापरवाना दारूची वाहतूक करणारे चारचाकी वाहन पकडले; तीन जणांना अटक

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील बुरूज चौककडून विनापरवाना देशी दारूची वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनावर पोलीसांनी कारवाई केली. या कारवाई १ लाख ५२ हजार ८८० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे. यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावल पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, यावल शहरातून शिरपूरकडून मध्यप्रदेशात विनपरवाना देशी दारूची वाहतूक चार चाकी वाहनातून होत असल्याची गोपनिय माहिती मिळाली. त्यानुसार सोमवारी १४ मार्च रोजी रात्री यावल पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार मुजफ्फर खान, सहायक फौजदार असलम खान, हवालदार बालक बाऱ्हे, सुशील घुगे, राहुल चौधरी, निलेश वाघ यांनी शहरातील बुरुज चौकात वाहन तपासणी करण्यात आली. यात शिरपूर कडून येणाऱ्या (एमएच ०१ बीडी ९१२४) या कारच्या डिक्कीत अवैधरित्या देशी दारू वाहतूक करतांना मिळून आली. वाहनात टँगो पंच या देशी दारूच्या ४८ बोटल मिळून आल्या.

याप्रकरणी अतुल अरुण मानकर, शुभम नरेंद्र मावळे दोन्ही रा. पिंपळगाव ता. जळगाव जामोद व निलेश सुभाष बेलदार रा. दापोरा ता.जि. बऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) या तीघांना पोलीसांनी ताब्यात घेतले. देशी दारू किंमत २ हजार ८८० व वाहन २ लाख ५० हजरात एकुण २ लाख ५२ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार असलम खान करीत आहे.

 

Protected Content