जिल्हा न्यायालयाच्या आवारातून वकीलाची दुचाकी लांबविली

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्हा न्यायालयाच्या आवारात पार्कींगला लावलेली वकीलाची १५ हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

जळगाव शहर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, बन्सीलाल मोतीराम महाजन (वय-५३) रा. सुकृती रेसीडेंन्सी जळगाव हे जिल्हा न्यायालयात वकीली म्हणून काम करतात. मंगळवार १५ मार्च रोजी दुपारी २ वाजता बन्सीलाल महाजन हे (एमएच १९ एके ९२३३) क्रमांकाच्या दुचाकीने जिल्हा न्यायालयात आले. न्यायालयाच्या आवारात असलेल्या पार्किंगमध्ये त्यांनी त्यांची दुचाकी पार्क करून लावली. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांची पार्किंगला लावलेली दुचाकी चोरून नेली. हा प्रकार लक्षात आल्यावर महाजन यांनी संपुर्ण न्यायालयाचा परिसर पिंजून काढला. दुचाकी न मिळाल्याने त्यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रफुल्ल धांडे करीत आहे.

Protected Content