जळगावचा ‘लिटील टायगर’ आदित्य पाटीलची ‘सुपर डान्सर’मध्ये धूम ! (Video)

शेअर करा !

जळगाव प्रतिनिधी । जळगावकर Aditya Patil आदित्य पाटील या चिमुकल्याने सोनी टिव्हीवर सुरू असलेल्या ‘सुपर डान्सर-४’ या स्पर्धेत पहिल्या १५ जणांमध्ये प्रवेश मिळवला असून तगडे आव्हान उभे केले आहे. रविवार झालेल्या कार्यकमात त्याच्या परफॉर्मन्सला जोरदार प्रतिसाद लाभला आहे.

याबाबत वृत्त असे की, सध्या सोनी टिव्हीवर सुपर डान्स या मालिकेतील चौथा सीझन सुरू आहे. यात जळगावातील आदित्य विनोद पाटील Aditya Patil या स्पर्धकाने भाग घेतला असून त्याने आता पहिल्या १५ स्पर्धकांमध्ये प्रवेश मिळविला आहे. काल रविवारी रात्री या स्पर्धेत अदित्यने आपल्या नृत्याचे सादरीकरण केले. यात त्याच्या नृत्याला परिक्षक शिल्पा शेट्टी, गीता कपूर आणि अनुराग बसू यांनी वाखाणले. यात अनुराग बसू यांनी आदित्यला स्टंट करायला सांगितले असता त्याने करून दाखविलेल्या परफॉर्मन्सला सर्वांनी दाद दिली. या स्पर्धेत त्याला लिटील टायगर असे नाव मिळाले असून याच नावाने तो आता ख्यात झालेला आहे.

सुपर डान्सर-४ हा कार्यक्रम २७ मार्चपासून प्रत्येक आठवड्यात शनिवार आणि रविवारी प्रसारीत करण्यात येणार आहे. यात विविध चाचण्यांमध्ये उत्तीर्ण झाल्यामुळे आदित्य पाटील Aditya Patil याला प्रवेश मिळाला आहे. आदित्य हा जळगावातील सुप्रीम कॉलनीतला रहिवासी आहे. तो योगेश मर्दाने यांच्या अयोध्यानगरातील डेनोव्हो क्लासमध्येे गत तीन वर्षांपासून नृत्याचे प्रशिक्षण घेत आहे. आता सुपर डान्सरमध्ये तो आगेकूच करत असल्याचे जळगावकरांसाठी ही अतिशय अभिमानाची बाब आहे.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!