जळगावात अर्थ व सांख्यिकी फेरीच्या प्रशिक्षण बैठकीचे उद्घाटन

जळगाव प्रतिनिधी । राज्य शासनाच्या अर्थ व सांख्यिकी विभागाकडून राष्ट्रीय नमुना पाहणीच्या 78 व्या फेरीच्या प्रशिक्षण बैठकीचे उद्घाटन अर्थ व सांख्यिकी संचालक र.र. शिंगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सदरची पाहणी जानेवारी 2020 ते डिसेंबर 2020 या दरम्यान घेण्यात येणार आहे.

प्रशिक्षण बैठकीला उपस्थितांना संबोधतांना शिंगे म्हणाले की, या प्रशिक्षणाचा उद्देश हा देशांतर्गत पर्यटनावरील खर्च आणि बहुविध निर्देशांक पाहणी हा असून कुटुंबयादी, देशांतर्गत पाहणी, बहू निदेशक पाहणी या विषयांची पाहणी असून तीनही प्रकारातील पत्रके भरावयाची आहेत.

पाहणीत 21.1 पत्रक (देशांतर्गत पाहणी) व 5.1 पत्रक बहू निदेशक पाहणी या पत्रकात शाश्वत विकास ध्येय साधनासाठी हवे असलेले मापदंड प्राप्त करण्यासाठी सरकारला उपयोग होणार आहे. या सर्वेक्षणातून शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहचल्या/किंवा काय सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. तसेच पर्यटन क्षेत्रांचा विकास व त्या ठिकाणाला भेट त्यातून किती विकास साधला याबाबत माहिती उपलब्ध होणार आहे.

शाश्वत विकास ध्येय साधण्यासाठी सरकारने 2014 पासून काम सुरू केले असून 2030 पर्यंत पुर्ण करावयाचे आहे. तसेच कोणत्या कारणास्तव स्थलांतर व 2014 नंतर झालेले नवीन बांधकाम याबाबत प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत अभियान यासारख्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहचल्या किंवा नाही याबाबतची विस्तृत माहिती गोळा करण्यात येणार आहे.

या पाहणीच्या निष्कर्षाचा उपयोग राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवर विविध धोरणे आखण्यासाठी व नियोजनासाठी केला जातो. त्यामुळे सदर पाहणीसाठी सर्वांनी योग्य माहिती देवून सहकार्य करावे, असे आवाहन सहसंचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, प्रादेशिक कार्यालय, नाशिक यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Protected Content