वेटलिप्टर अभिषेक महाजन यांना ‘ रावेर रत्न ’ पुरस्कार प्रदान

रावेर (प्रतिनिधी) येथील किल्ला प्रतिष्ठानतर्फे आयोजित जादुगर ए. लाल यांच्या कार्यक्रमात परिसरातुन चांगला प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमात सुरवातीस वेटलिफ्टिंग खेळातील राष्ट्रीय पातळीवरील खेलो इंडिया खेलो स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता अभिषेक महाजन यांना  किल्ला प्रतिष्ठानतर्फे ‘ रावेर रत्न ’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

येथील किल्ला प्रतिष्ठान सामाजिक उपक्रमांमध्ये अग्रसर असलेल्या संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत असुन याच माध्यमातून मॅजिक शो इव्हेंटचे आयोजनही करण्यात आले होते. जादुसम्राट ए. लाल जादुगर यांनी सुमारे अडीच तासांच्या कार्यक्रमात विविध कला सादर करून प्रेक्षकांना जागेवर खिळवून ठेवले. या वेळी बाल प्रेक्षकांमध्ये मोठे कुतूहल दिसून आले. परिसरातील नागरिकांनी या कार्यक्रमास भरभरून दाद दिली. जादुगर ए. लाल यांनी डोळ्यावर पट्टी बांधून शहरातील प्रमुख मार्गावरून मोटार सायकल चालवून शहर वासीयांचे लक्ष वेधुन घेतले.

या कार्यक्रमाच्या सुरवातीस अभिषेक महाजन याला प्रा. जे. डी. लेकुरवाळे ( जळगाव ) यांच्या हस्ते तसेच प्रतिष्ठानचे पदाधिकारी व सदस्यांच्या उपस्थितीत रावेर रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दरम्यान अभिषेक स्वत: पटीयाला येथे ऑलंपिक स्पर्धेच्या सरावासाठी गेला असल्याने त्याचे वडील गणेश महाजन यांनी हा पुरस्कार स्विकारला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किल्ला प्रतिष्ठानचे अध्यक्ष अक्षय अग्रवाल, उपाध्यक्ष रविंद्र महाजन, सचिव प्रणित महाजन, कोषाध्यक्ष सोनूबाई पाटील, सहसचिव विक्रम सोनार, सदस्य नितीन नेमाडे, तुषार महाजन, नितीन माळी, युवराज माळी, निलेश महाजन, नंदु मानकर, अक्षय महाजन, हितेश मानकरे, डॉ. दिपक सोलंकी, संदिप महाजन, दिपक महाजन, सुनील महाजन व सर्व सभासद तसेच सहकारी मित्र परिवार यांनी सहकार्य केले.

Add Comment

Protected Content