प्रभाग रचना व प्रारूप मतदार याद्याच्या घोळाबाबत उच्च न्यायालयात याचिका                              

रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर नगरपालिकेच्या होणाऱ्या ‘सार्वत्रिक निवडणूक २०२२’साठी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून जाहीर केलेल्या प्रभाग रचनेच्या आणि प्रारूप मतदार याद्यामध्ये केलेल्या घोळाबद्दल उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे.

नगरपालिका प्रशानाने नुकतीच प्रभाग रचना आणि प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या आहे परंतु याबाबत जनतेत अत्यंत नाराजी व सभ्रम निर्माण झाला आहे काही राजकीय नेत्यांच्या दबावाखाली त्यांच्या फायद्यासाठी चुकीची प्रभाग रचना आणि प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. सदरच्या चुकीच्या प्रभाग रचनेवर मुख्याधिकारी रावेर यांचे कडे हरकती नोंदविल्या होत्या. त्यावर जिल्हाधिकारी यांचेकडे सुनावणी होऊन नागरिकांच्या हरकती दि २ जून रोजी  आयुक्त नाशिक विभाग यांनी फेटाळून लावल्या. त्यानंतर दि. २१ जून रोजी नगरपालिका प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार यादीतसुद्धा मोठया प्रमाणात घोळ असून बाहेरगावच्या मतदारांची नावेदेखिल समाविष्ट करण्यात आली आहे.

दुसऱ्या प्रभागातील मतदारांची देखिल नावे समाविष्ट करण्यात आली आहे. याबाबत दि. २३ जून रोजी शहरातील सर्वपक्षीय कार्यकर्यांनी मुख्याधिकारी यांचे कडे हरकत घेतली होती तसेच नागरिकांनी देखिल मोठया प्रमाणात हरकती घेतलेल्या आहे. सदर हरकती घेण्याची अंतिम मुदत सोमवार, दि.२७ जून होती नागरिकांनी सायंकाळी ६ वाजेपर्यंत हरकती घेतल्या; परंतु नगरपालिका प्रशासनाने हरकतीची गंभीर दखल न घेता राज्य निवडणूक आयोगाच्या परिपत्रकाप्रमाणे प्रभागात प्रत्यक्ष न जाता कोणतेही स्थळ निरीक्षण न करता दि. २८ जून पासून हरकती फेटाळण्याची सुरुवात केल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे लवकरच उच्च न्यायालयात याचिका दाखल करून न्याय मांगणार असल्याचे पत्रकाद्वारे माजी नगराध्यक्ष व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पदमाकर महाजन यांनी सांगितले आहे.

Protected Content