राज ठाकरेंच्या आवाहनामुळे कोरोना संसर्ग वाढला; वकिलाची पोलिसात तक्रार

औरंगाबाद : वृत्तसंस्था । मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या मास्क न घालण्याच्या आवाहनामुळे राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढला, असं तर्कट लावत अॅड. रत्नाकर चौरे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. 

औरंगाबादच्या क्रांतीचौक पोलिस ठाण्यात राज ठाकरे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आलीय. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माध्यमांच्या कॅमेरासमोर मी मास्क घालतच नाही, असं वक्तव्य केलं होतं. नाशिकच्या दौऱ्यात माजी महापौर अशोक मुर्तडक यांना चेहऱ्यावरील मास्क उतरवण्यास सांगितलं होतं. एकूणच राज ठाकरे यांच्या मास्क न घालण्याच्या आवाहनामुळे राज्यात कोरोना वाढला असं म्हणत अॅड. रत्नाकर चौरे यांनी औरंगाबादच्या क्रांतीचौक पोलिस ठाण्यात राज ठाकरे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

कोरोनाच्या संकटकाळात राज्य शासन नागरिकांना कोरोना प्रतिबंधक नियम पाळण्यास सांगत आहे. अशा काळात एखादा जबाबदार नेता अशा प्रकारचं आवाहन करतो, तर लोक त्याला का फॉलो करणार नाहीत, असा प्रश्न यानिमित्ताने त्यांनी उपस्थित केला.

‘राष्ट्रवादीचे नेते आणि प्रवक्ते राष्ट्रवादीचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो  यांनीही राज ठाकरे यांना याचविषयी पत्र लिहिलं आहे. राजसाहेब आपण मास्क घाला, लोकं तुम्हाला मानतात, अशा आशयाचं पत्र त्यांनी लिहिलं आहे. साहजिकच राज ठाकरेंच्या तोंडाला मास्क नसलं की लोकांच्यामध्ये चर्चा रंगते.

Protected Content