मी जिंकलो, तर पूर्ण देशाचे राजकारण बदलेल : प्रकाश आंबेडकर

ad. aambedkar

 

जालना (वृत्तसंस्था) या निवडणूकीत मी जिंकलो, तर पूर्ण देशाचे राजकारण बदलेल’, असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला. ते जालनाच्या घनसावंगी येथील जाहीर सभेत बोलत होते.

 

वंचितचे घनसावंगी मतदारसंघाचे उमेदवार विष्णू शेळके यांच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. हे सरकार घालवले नाही, तर मोदी तुमच्या बँक खात्यातील 90 टक्के रक्कम काढून घेईल, असा टोला आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदी यांना लगावला. विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकरांची जालनाच्या घनसावंगी येथे सभा झाली. आपण घराणेशाही विरोधात बोलतो, त्यांच्या येथेही घराणेशाही आहे. उमेदवारांना दुसऱ्याच्या बॅग उचलण्याच्या पलीकडे दुसरा मार्गच नाही. ना सन्मान, ना मान, ना सत्ता आणि म्हणून महाराष्ट्राची निवडणूक अलुतेदार आणि बलुतेदार यांच्या दृष्टीने महत्वाची असल्याचे आंबेडकर यांनी म्हटले.

Protected Content