मंत्रिमंडळ बैठकीत शहरांच्या नामांतराचे प्रस्ताव

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर तर उस्मानाबादचे नामांतर धाराशीव करण्याचा निर्णय घेण्यात आले आहेत.

 

राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मंत्री सहभागी झाले. तर शिवसेनेतर्फे अनिल परब, सुभाष देसाई आणि आदित्य ठाकरे हे देखील या मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित होते. दरम्यान, बैठक सुरू असतांनाच काँग्रेसच्या मंत्री वर्षा गायकवाड आणि असलम शेख हे निघून गेले. यामुळे चर्चा सुरू झाली. यानंतर वर्षा गायकवाड या पुन्हा बैठकीत आल्या. फाईल विसरल्यामुळे आपण गेलो असल्याची माहिती त्यांनी दिली.

 

आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत  शिवडी-न्हवाशेवा मार्गाला बॅरिस्टर ए.आर. अंतुले यांचे नाव आणि नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी सुद्धा काँग्रेसतर्फे करण्यात आली. यानंतर शिवसेनेने औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर तर उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव करण्याचा प्रस्ताव दिला याला मंत्रिमंडळाने संमती दिली.

Protected Content