जामनेर पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक संपन्न

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता कमिटीची बैठक शहरातील भगीरथी बाई मंगल कार्यालयात घेण्यात आली.

मार्गदर्शन करतांना डीवायएसपी चोपडे यांनी सांगितले की, प्रत्येकाने कायदयाच्या चाकोरीत राहून येणारे उत्सव साजरे करावे , आपल्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही समाजात अशांतता वातावरण पसरणार नाही याची दक्षता काळजी घ्यावी, पोलिस प्रशासन आपल्या नेहमी सोबत व पाठीशी आहे, दिलेल्या सुचना, नियम यांचे काटेकोर पणे पालन करावे अश्याही सुचना त्यांनी दिल्या.

याप्रसंगी नगरपालिकेचे मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले, भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, जितेंद्र पाटील, नगरसेवक महेंद्र बावस्कर , पोलिस निरीक्षक किरण शिंदे उपस्थित होते.

प्रत्येक मंडळाने रितसर परवानगी घेवुनच मुर्ती स्थापन करावी , तसेच मुर्ती स्थापन करण्यात येइल त्या परिसरात दक्ष रहावे ,
अश्या सुचना केल्या. मुख्याधिकारी भोसले यांनी जामनेर नपा प्रशासन मंडळाच्या सोयी सुविधा , समस्या , तक्रारी सोडवण्या .साठी तत्पर असेल असे यावेळी सांगीतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुहास चौधरी तर आभार पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी मानले. बैठकीला शहरातील सामाजिक कार्यकर्ते, मंडळ पदाधिकारी हजर होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पोलिस कर्मचारी तुषार पाटील, निलेश घुगे, सुनिल माळी यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले.

Protected Content