पालकमंत्र्यांच्याहस्ते बांभोरी परिसरात विकासकामांचे भूमिपूजन

धरणगाव प्रतिनिधी । गावात एकोपा असल्यास तो विकासासाठी दिशादर्शक ठरत असतो, राजकारणाच्या ठिकाणी राजकारण हे अवश्य असावे. मात्र याचा विकासावर विपरीत परिणाम होता कामा नये असे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. ते तालुक्यातील बांभोरी प्रचा येथे विविध विकासकामांच्या भूमिपुजनाच्या प्रसंगी बोलत होते.

तालुक्यातील बांभोरी प्र.चा. येथे आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते विकासकांमांचे भूमिपुजन करून उदघाटन करण्यात आले. या प्रामुख्याने तालुक्यातील बाभोरी प्रचा येथे २५१५ अंतर्गत स्मशान भूमी परिसरात पेव्हर बसविणे-  ६ लक्ष, भोकणी येथे गावं अंतर्गत नवीन गटार बांधकाम करणे – ३ लक्ष, नवीन स्मशान भूमी बांधकाम -३ लक्ष, भोंकणी ते बाभोरी प्रचा रस्ता डांबरीकरण -१३ लक्ष अश्या २५ लक्ष निधीच्या कामांचे भूमिपूजन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजा करून  करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा सत्कार केला.

याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, जिल्हा परिषदेकडील बांभोरी – भोकणी – आव्हाणी हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करून रुंदीकरण करण्याबाबत कार्यवाही च्या सूचना संबंधित अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. हा शेतकर्‍यांचा प्रलंबित विषय मार्गी लावणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. तर बांभोरी प्रचा आणि परिसरात विकासकामांचे नवीन पर्व सुरू झाले असून येत्या काळात परिसरात सर्वांगीण विकास साधण्यात येणार असल्याचा आपला संकल्प असून आजचे भूमिपुजन हे  याच दिशेने टाकलेले महत्वाचे पाऊल असल्याचे प्रतिपादन ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी केले.

याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील, सरपंच  संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सचिन पवार , माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, भिकन नन्नवरे, उपसरपंच तुळसाबाई नन्नवरे , माजी सरपंच ईश्वर नन्नवरे, ग्रा. प . सदस्य हिरामण नन्नवरे,  नरेंद्र पाटील, पांडुरंग हिवरकर, सदाशिव पाटील, महेंद्र   नन्नवरे, सुनिल नन्नवरे, धनराज साळुंके, चंदन कळमकर, मंडळ अधिकारी अमोल पाटील, ग्रामविकास अधिकारी डी. डी. पाठक, शाखा अभियंता एस. ए. सपकाळे यांच्यासह परिसरातील पदाधिकारी व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

 

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!