महिलांवर होत असलेल्या अन्याय अत्याचारांचा सावद्यात निषेध

सावदा ता. रावेर प्रतिनिधी । आज बेटी बचाव बेटी पढाओ व भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून महिलांवर होत असलेल्या अत्याचारांचा निषेध करत फैजपूर प्रांत अधिकारी कैलास कलगड यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, स्त्रीयांवर होणारे अत्याचार, बलात्कार व हत्यांसंदर्भात शासनाने कडक धोरण अवलंबून गुन्हेगारांना दयामया न दाखवता त्वरित फाशी द्यावी, अशी मागणी जळगाव जिल्हा संयोजक बेटी बचाओ – बेटी पढाओ व भारतीय जनता पार्टीतर्फे सारीका चव्हाण यांनी केली आहे.

हत्येच्या विरोधात निवेदन देण्यात आले व तमाम घटनांचा निषेध करण्यात आला त्याप्रसंगी बेटी बचाव बेटी पढाओ च्या जिल्हा संयोजक सारीका चव्हाण, रावेर तालुका पंचायत समितीच्या योगिता वानखेडे, नगरसेविका रंजनाताई भारंबे, डॉ. प्रिया सरोदे, राजश्रीताई चौधरी, सावदा शहर अध्यक्ष पराग पाटील, फैजपूर शहर अध्यक्ष अनंत नेहते, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सागर चौधरी, यावल तालुका भाजप उपाध्यक्ष नितीन नेमाडे व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!