यावल पोलीस निरिक्षकांनी आदीवासी पाडयांवर जावुन घेतली ग्रामस्थांची भेट

WhatsApp Image 2020 01 08 at 7.04.10 PM

यावल, प्रतिनिधी | तालुक्यातील सातपुडा डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या आदीवासी नागरीकांच्या वस्तीवर अचानक जावुन सकाळी पाडयांवरील आदीवासी बांधवांशी पोलीस निरिक्षकांनी संपर्क साधुन त्यांच्या समस्या व अडीअडचणी जाणुन घेतल्या आणि त्यांना कायदा सुव्यव्यवस्थेविषयी माहिती दिली.

यावल तालुका पोलीस स्टेशनला नुकतेच रुजु झालेले पोलीस निरिक्षक अरूण धनवडे हे आज सकाळच्या सुमारास आपल्या मॉर्निंग वॉकला यावल शहरापासुन सुमारे ११ किलोमिटर लांब असलेल्या व वड्री गावाजवळ सातपुडा डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी बांधवांच्या आसराबारी पाडयावर त्यांनी अचानक  भेट दिली. आपल्या भेटीला पहील्यांदा अशा प्रकारे पोलीस निरिक्षक आल्याचे पाहुन आदीवासी बांधवांमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी त्यांच्यासोबत वड्री गावाच्या पोलीस पाटील लतीता मिलींद भालेराव , आसराबारीचे पोलीस पाटील खेत्या लल्लु पावरा यांनी पोलीस निरिक्षकांना गावातील आदिवासी बांधवांचे परिचय करून दिले. याप्रसंगी पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांनी आदीवासी बांधवांशी सुसंवाद साधुन त्यांना आपल्या हक्काविषयी कायद्याची जाणीव करून दिली व आत्मविश्वास निर्माण केले. आपल्यावर अन्याय होत असल्यास आपण माझ्याशी कुठलेही विलंब न लावता त्वरीत माझ्याशी संपर्क साधावा असेही उपस्थित आदीवासी बांधवांशी बोलतांना पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांनी सांगीतले.

Protected Content