काँग्रेस पक्षाच्या वतीने भादली बुद्रुक येथे भव्य रेशन कार्ड शिबीर

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | आज जळगाव तालुका काँग्रेसच्या वतीने भादली येथे भव्य रेशनकार्ड शिबीर संपन्न झाले.

आज रविवार, दि.२६ जून रोजी जळगाव तालुका काँग्रेस च्या वतीने युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्या प्रमुख उपस्थितीत भादली येथे भव्य रेशनकार्ड शिबीर युवा नेते मुरली सपकाळे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला. एकीकडे मतदारसंघाचे आमदार पद व पैशांसाठी फरार दुसरीकडे मात्र काँग्रेस कामाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरलेली असल्याचे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी केले.

यामध्ये नवीन रेशनकार्ड काढणे, नाव वाढवणे, नाव कमी करणे, बारा अंकी नंबर करणे, दुय्यम रेशनकार्ड काढणे ही सर्व कामे या शिबिराच्या माध्यमातून सर्व सामन्य जनतेला लाभ मिळणार आहे..सकाळी ९ वाजेपासून शिबिराला सुरुवात झाली या शिबिराच्या माध्यमातून अनेक लोकांनी याचा लाभ घेतला.

याप्रसंगी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, तालुकाध्यक्ष मनोज चौधरी ,मुरली सपकाळे, सरपंच मिलिंद चौधरी, सदस्य अंजली ताई, संदीप कोळी उपस्थित होते. शिबिरासाठी मुरली सपकाळे, वसीम पटेल, ग्रा पं सदस्य संदीप कोळी, किशोर कोळी, इजाज पटेल, दीपक कोळी, नाना कोळी आदी लोकानी परिश्रम घेतले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.