नोकरीचे आमिष दाखवून तरूणाला गंडवले

download

जळगाव प्रतिनिधी | वर्तमानपत्रात आलेल्या जाहिरातीवरून एका 28 वर्षीय तरूणाला 5 हजार 600 रूपये ऑनलाईन पेमेंट करून फसवणूक केल्याप्रकरणी रामानंद नगर पोलीसात अज्ञातांविराधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, विरेंद्र जयराज मराठे (वय 28) रा. शिव कॉलनी हे केसीई इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. कुठे नोकरी मिळते का ? या हिशोबाने ते प्रत्येक वर्तमानपत्र चाळत असताना दैनिक लोकमतमध्ये त्यांना एक जाहिरात मिळाली. त्या जाहिरातीवरून त्यांनी संबंधित व्यक्तीला कॉल केला. समोरील अज्ञात व्यक्तीने त्यांना सुरुवातीला ट्रेनिंग म्हणून 1600 रुपये भरण्यास सांगितले. त्यानुसार मराठे यांनी 1600 रुपये ऑनलाइन पेमेंट केले. त्यानंतर ते गावाला निघून गेले गावाहून परत आल्यानंतर त्यांनी संबंधित व्यक्तीला पुन्हा फोन केला. त्यावर त्यांनी बँक पासबुक ओपनिंग करण्यासाठी तुम्ही पुन्हा 4 हजार रुपये बँकेत टाका त्यानुसार श्री मराठे यांनी पुन्हा त्याच अकाउंट नंबर वरती 4 हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले त्यानंतर त्यांना पुन्हा अजून काही पैसे भरण्यास सांगितल्यानंतर मराठी यांना संशयास्पद असल्याचे लक्षात आले. आपली फसवेगिरी होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी रामानंदनगर पोलिसात घडलेली घटनेबाबत माहिती सांगून तक्रार नोंदवली आहे.

Protected Content