धरणगाव येथे पाण्याच्या टँकरचा काळाबाजार

water tanker

धरणगाव (प्रतिनिधी) पाणी टंचाईच्या काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी नागरपरिषदेतर्फे फी आकारून पाण्याचे टँकर पुरविले जात आहे. मात्र, जो जादा दाम देईल त्याला टँकर पुरविला जात असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.

शहरात पाणी संकट बिकट बनले आहे. यावर मत करण्यासाठी घरोघरी २५० रुपयांची पावती फाडून टँकरद्वारे पाणी पुरविण्यात येत आहे. परंतु, या टँकरवरील कर्मचारी मनमानी पद्धतीने वागून जो जास्तीचे पैसे मोजेल त्याला टँकर पुरविण्यास प्राधान्य देत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. याप्रकाराबाबत नागरिकाने चौकशी केली तर त्याच्यापर्यत पाण्याचे टँकर पोहचूच दिले जात नसल्याचा धक्कादायक प्रकार घडत आहे. या टँकरवरील मुजोर कर्मचारी नगराध्यक्ष , उपनगराध्यक्ष, नगरसेवक, मुख्य कार्यकारी अधिकारी ,त्याचबरोबर पाणी पुरवठा विभाग यांचेसुद्धा ऐकत नसल्याचे दिसून येत आहे. याप्रकाराबाबत टँकर कर्मचाऱ्यांना विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. हे कर्मचारी गणेश नगर, चिंतामण मोरया नगर, महात्मा फुले नगर, हेडगेवार नगर, श्री स्वामी समर्थ नगर याठिकाणी सर्व नोकरदार वर्ग राहत असल्याने ते जासतीचे पैसे देत मोजून टँकर घेत असल्याने त्यांना नियमित पाणी मिळत आहे. तर दुसरीकडे गावातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

अधिकाऱ्यांची उडवाउडवीची उत्तरे
याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना विचारले असता यांनीही जबाबदारी झटकली. त्यांनी सांगितले की, हा विभाग पाणीपुरवठा यांच्याकडे आहे. त्यांना कॉल केला असता त्यांनीही अशाच पद्धतीने जबाबदारी झटकून टाकले. त्यांनी सांगितले हा विभाग भाऊसाहेब गांगुर्डे यांच्याकडे आहे. गांगुर्डे यांनी त्या कर्मचाऱ्यांना कॉल करून विचारणा केली असता त्या कर्मचाऱ्याने तांत्रिक अडचणींमुळे टँकर टाकले नाही असे उत्तर दिले, तांत्रिक अडचणीच्या मागे लपुन
टँकर पुरविण्यास नकार दिला असतांना कॉलनी परिसरात सुरळीतपणे टँकरद्वारे पाणी पुरवठा होत असल्याचे नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Add Comment

Protected Content