महात्मा फुले हायस्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप !

धरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेने वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप दिला.

निरोप समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जे. एस. पवार होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष व सर्व उपस्थित गुरुजनांच्या हस्ते शिक्षणतज्ञ राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

वर्ग दहावीचे वर्ग शिक्षक पी डी पाटील यांनी वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षे संदर्भात विस्तृत अशा सूचना केल्या. वर्षभर विद्यार्थ्यांच्या जन्मदिनी “फोल्डर फाईल ” भेट देण्याचा उपक्रमाची सांगता या कार्यक्रमात करण्यात आली भावना गायकवाड व संदीप गायकवाड यांचा जन्मदिवस असल्याने मुख्याध्यापकांच्या हस्ते त्यांना फोल्डर फाईल भेट देण्यात आली. यानंतर शासकीय चित्रकला परीक्षा इंटरमिजिएट मध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर दहावीच्या विद्यार्थ्यांनी मनोगतात आपल्या शाळेतील आठवणींना उजाळा दिला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष जे. एस .पवार यांनी पी. डी. पाटील यांचा राबविलेल्या कार्यक्रमाचे अभिनंदन व कौतुक केले. दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावरील महत्त्वाच्या सूचना दिल्या व येणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेसाठी शाळेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा दिल्या. यानंतर सर्व विद्यार्थ्यांना अल्पोहार देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी डी पाटील तर आभार एस एन कोळी यांनी मानले.

Protected Content