Home Cities धरणगाव पाळधी येथील मुस्लिम समुदायाची गुलाबराव पाटील यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली

पाळधी येथील मुस्लिम समुदायाची गुलाबराव पाटील यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली

0
56

f0902376 6ee5 4c13 9277 adf679042870
 

धरणगाव (प्रतिनिधी) शिवसेना भाजपा रिपाई महायुतीचे उमेदवार ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रचारार्थ आज मुस्लिम समुदायाने पाळधीत भव्य प्रचार रॅली काढली.

 

राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांना प्रत्येक गावातील मुस्लिम व इतर समुदायांचे इतर समाजाचे अधिकाधिक मतदान मिळवण्यासाठी पाळधी बुद्रुक व खुर्द येथील मुस्लिम समाज पुढे सरसावला आहे. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या विकास कामांसाठी व त्यांचे मुस्लिम बांधवांशी असलेली मैत्री सर्वश्रुत आहे. त्यामुळे मतदारसंघातील मुस्लिम समाजाच्या प्रमुख व्यक्तींच्या नेतृत्वात एक टीम तयार करण्यात आली आहे. ती टीम प्रत्येक गावात जाऊन त्या प्रचार जनजागृती व प्रचार करीत आहे. तसेच रॅलीची सुरुवात पाळधी बुद्रुक व खुर्द येथून करण्यात आली.

 

या प्रचार रॅलीचे नेतृत्व मुस्लिम समाजाचे यासीन हाजी लियाकत पठाण , शाहरुख खान, पठाण अहमद खान,जि प सदस्य प्रतापराव पाटील, सरपंच प्रकाश पाटील, माजी सरपंच संजय भैय्या देशमुख, अरुण पाटील, संजय महाराज, लियाकत पठाण, हाजी पठाण ,शकील खान, इक्बाल शेख ,शरीफ देशपांडे, सादिक पटेल ,शारुख शेठ यांच्यासह यांच्या नेतृत्वात पाळधी बुद्रुक व खुर्द या दोन्ही गावातील राज मार्गावरून भव्य रॅलीचे नियोजन करण्यात आले होते.

 

यावेळी गावातील मुस्लीम हिंदू बांधवांनी एकत्रित येऊन सहकार राज्यमंत्री तथा शिवसेना-भाजपा महायुतीचे दिग्गज उमेदवार गुलाबराव पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करण्यासाठी मतदारसंघातील प्रत्येक गावात जाऊन प्रचार करीत आहे. आज पाळधी येथील मुस्लिम भागापासून प्रचाराला सुरुवात करण्यात आली.तेथून देशमुख वाडा महाराणा, प्रताप चौक, माळीवाडा गल्ली, रेल्वे स्टेशन परिवार ,प्लॉट एरिया गावातील प्रमुख राजमार्ग या भागात हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित राहून एकजूट एक विचार- गुलाब भाऊ पुन्हा आमदार , शिवसेना जिंदाबाद , अशा विविध घोषणा देऊन आताच धनुष्यबाणाचे कटाउट ,भगवे ध्वज ,भगवे झेंडे घेऊन संपूर्ण दोन्ही पाळधी गाव भगवामय करण्यात आले होते. यावेळी गावातून मुस्लिम समाजाने काढलेल्या प्रचार रॅलीची एकच चर्चा परिसरात रंगू लागली आहे.


Protected Content

Play sound