विकासाच्या प्रामाणिक प्रयत्नाला साथ द्या ; गुलाबराव पाटील यांचे भावनिक आवाहन

b0aeb8c5 a874 452e a8aa 5a9629a55a58 1

 

जळगाव (प्रतिनिधी) मागील 35 वर्षाच्या राजकीय जीवनात शिवसैनिकांसोबतच सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांची अडलेली कामे केली आहेत. लोकप्रतिनिधी म्हणुन पक्षभेद न ठेवता सर्वांसाठी कर्तव्य पार पाडले. शिवसेना-भाजपा महायुतीचा युती धर्म नेहमीच पाळला असून वैयक्तिक द्वेषापोटी बंडखोर विरोध करत आहेत. माझ्यावर वैयक्तिक टीका करण्यापेक्षा कामावर बोला. मात्र शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी दिड हजार कोटीची झालेली कामे हीच माझी जनतेच्या आशीर्वादाची परतफेड असून विकासाची ही गंगा पुढे घेऊन जाण्यासाठी बंडखोरांना गाडून विकासाला प्रामाणिक साथ द्या असे आवाहन शिवसेना उपनेते सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी मोहाडी येथे मेळाव्या प्रसंगी बोलताना केले.

 

बिलवाडी व वडली येथील रा.कॉ. कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश !

 

जळगाव तालुक्यातील बिलवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रा.पं.सदस्य त्र्यंबक डवरे,संतोष पाटील, नाना दगडू वाघ, सचिन पाटील, छोटू पाटील ,सचिन पाटील तसेच वडलीचे ..दिपक पाटील,अमोल पाटील,शरद पाटील,संतोष कुंभार, दिपक पवार यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी मोहाडी येथे झालेल्या मेळाव्यात नामदार गुलाबराव पाटील यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला.

 

भव्य रॅलीचे रूपांतर मेळाव्यात झाले.मेळाव्याचे अध्यक्ष गोपाळ जिभाऊ पाटील होते. या प्रसंगी मेळाव्याला गोपाल जिभाऊ पाटील , भरत बोरसे , महिला आघाडी संपर्कप्रमुख रचना पाटील, जि. प .सदस्य पवन सोनवणे,शिवसेनेचे नाना सोनवणे,राजेंद्र चव्हाण,संजय घुगे, रावसाहेब पाटील, शिवराय पाटील, मुकेश सोनवणे, जीतूपोळ,केतन पोळ, विजय लाड, देविदास कोळी ,सुनील बडगुजर, सुनील मराठे,शिवाप्पा चिंचोरे, गोलांडे,चावदस कोळी, साहेबराव वराडे, वराडे, ब्रिजलाल पाटील,जनार्दन पाटील, शिवा मांडे,राजू पाटील ,भरत मांडे ,कैलास बिर्हाडे, सुमित धनगर , प्रवीण पाटील, सुरेश धनगर, देविदास पाटील, निलेश ठाकरे ,कैलास कोळी , डम्पी सोनावणे,भगवान पाटील, प्रवीण परदेशी ,भिमसिंग परदेशी, सतीश परदेशी ,मानसिंग परदेशी, पंकज पाटील, नंदकुमार देशमुख ,प्रमोद मोरे, नाना वाघ भाजपाचे मनोहर पाटील, भगवान खैरनार ,जगन पाटील, चेतन पर्देशी पंचायत समिती सदस्य नंदलाल पाटील ,समाधान चिंचोरे ,विजय आमले शिरसोली येथील विकास पाटील ,बारी समाज उपाध्यक्ष शांताराम काटोले, बबन धनगर, अकिल शेख,नासिर टेलर शेणफडू पाटील,गोपाळ बारी,जितेंद्र खळसेयांच्यासह या परिसरातील महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते व सुमारे दिड हजार शिवसैनिक उपस्थित होते.

 

भाेई समाजाचा शिवसेनेला जाहीर पाठिंबा !

 

जळगाव ग्रामीणचे शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार गुलाबराव पाटील यांच्या प्रचारासाठी म्हसावद, नशिराबाद, आव्हाणे, कानळदा, येथे भोई समाज बाधंवासोबत कॉर्नर बैठक घेण्यात आल्या. यावेळी त्या – त्या गावातील समाजबाधंव सोबत शिवसेना महानगर प्रमुख सौ.ज्योतीताई शिवदे, भोई समाज जळगांव जिल्हा अध्यक्ष यशवंत भोई,जिल्हा सचिव महारू शिवदे,पाळधी भोई समाज अध्यक्ष,भिमराव भोई,पाळधी सचिव,मुकेश भोई,प्रविण भोई,संतोष भोई, जळगांवचे छोटू भाऊ शिवदे,विक्की भाऊ,पप्पु शिवदे,सर्व समाज बाधंव उपस्थीत होते. गुलाबराव पाटील यांच्या कार्यकर्तृत्वामुळे व मतदारसंघात केलेल्या विकास कामांमुळे गुलाबराव पाटील यांना भोई समाजाच्या वतीने जाहीर पाठिंबा जिल्हाध्यक्ष यशवंत भोई, ज्योतीताई शिवदे यांनी जाहीर केला.

 

Protected Content