बेकायदेशीरपणे गावठी पिस्तोल बाळगणाऱ्या तरूणास अटक

Chopda news

चोपडा प्रतिनिधी । बेकायदेशीरपणे गावठी पिस्तोल आणि जिवंत काडतूस घेवून फिरणाऱ्या तरूणास धरणगाव ते चोपडा रस्त्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून त्यांच्या ताब्यातील गावठी पिस्तोल आणि जिवंत काडतूस हस्तगत केले. याप्रकरणी चोपडा शहर पोलीसात आर्म ॲक्टनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, चोपडा ते धरणगाव रोडने संशयित आरोपी योगेश पन्नालाल भोई वय-20 रा. कोळंबा ता.चोपडा हा गावठी पिस्तोल आणि जिवंत काडतूस घेवून फिरत असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक बापू रोहम, पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, अपर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, सहाय्यक पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांचे सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक व चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पो.नि. व्ही.पी. लोकरे, पो.कॉ. प्रदीप राजपूत, प्रकाश मथुरे, शेषराव तोरे मिलिंद सपकाळे यांनी संशयित आरोपी योगश याला अटक करून त्याच्या ताब्यातील एक गावठी बनावटीचे पिस्टल काळ्या रंगाचे मॅगझीन असलेले व ०१ जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. चोपडा शहर पोलीसात आर्म ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content