फैजपूर येथे शालेय विद्यार्थ्यांना कापडी पिशव्या वाटप

kapadi pisavi

फैजपूर प्रतिनिधी । न.पा. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत प्लॉस्टीक बंदीला पर्याय म्हणून राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ व पर्यावरण विभाग आणि महिला आर्थिक विकास महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने महिला बचत गटांनी तयार केलेल्या कापडी पिशव्या शालेय विद्यार्थ्यांना नुकत्याच मोफत वाटप करण्यात आल्या.

याबाबत अधिक माहिती अशी की, न.पा.स्वच्छ भारत मिशन अंतर्गत प्लॉस्टीक बंदीला पर्याय म्हणून राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ व पर्यावरण विभाग आणि महिला आर्थिक विकास महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने महिला बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या कापडी पिशव्या शालेय विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आल्या असून प्लॉस्टीक न वापरण्याबाबत प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी किशोर चव्हाण(मुख्याधिकारी), विपुल साळुंखे (पा.पू.अभियंता), प्रविण सपकाळे (सहा.प्रकल्प अधिकारी), राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशन विभागाचे आर.एल.आगळे (मुख्याध्यापक), मुनिसिपल हायस्कूल फैजपूर आशिष मोरे (समन्वयक) माविम फैजपूर व इतर अधिकारी यांच्यासह शिक्षकवृंद, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

Protected Content