धुवां…धुवां…हो रहा हैं समा, कही तो हैं आग लगी !

aa. khadase

 

जळगाव (प्रतिनिधी) कधी काळी जळगाव जिल्हा, उत्तर महाराष्ट्रासह अवघ्या महाराष्ट्रातील भाजप उमेदवारी बाबत निर्णय प्रक्रियेत असणारे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना स्वत:च्या मतदार संघात मुलगी नव्हे, तर आपणच इच्छुक असल्याचे सांगावे लागणे. तसेच स्टार प्रचारकचा दर्जा देऊन देखील उमेदवारांच्या पहिल्या यादीत त्यांचे नाव नसणे. यावरून ‘धुवां…धुवां…हो रहा हैं समा, कही तो हैं आग लगी’! असं वातावरण असल्याची जोरदार चर्चा आहे.

 

या संदर्भात अधिक असे की, माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांचा पारंपारिक मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघातून या वेळी खडसे यांच्या कन्या तथा जिल्हा बँकेच्या चेअरमन रोहिणी खडसे – खेवलकर यांना उमेदवारी मिळण्याची जोरदार चर्चा सुरु आहे. याबाबत मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघातून भाजपच्यावतीने सध्या रोहिणी खडसे – खेवलकर यांच्या नावाची चर्चा असली तरी या मतदारसंघातून मीच इच्छुक आहे, असे खुद्द माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी कधीच जाहीर केले होता. थोडक्यात खडसे यांनी सावध प्रतिक्रिया देत, पक्ष जो निर्णय घेईल, तो घेईल, मात्र या मतदार संघातून मीच इच्छुक असल्याचे सांगण्यास विसरले नव्हेत. एकंदरीत कधी काळी जळगाव जिल्हा, उत्तर महाराष्ट्रासह अवघ्या महाराष्ट्रातील भाजप उमेदवारी बाबत निर्णय प्रक्रियेत असणारे खडसे यांना स्वत:च्या मतदार संघात मुलगी नव्हे, तर आपणच इच्छुक असल्याचे सांगण्याची वाईट वेळ आली होती. हा अपमान जिरवत नाही, तोच भाजपच्या पहिल्या यादीतून त्यांचे नाव वगळून खडसे यांचा पुन्हा मोठा अपमान करण्यात आला आहे.

 

दरम्यान, केंद्रात ज्या पद्धतीने माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासारख्या दिग्गजांची तिकीटे वयाचे कारण सांगत कापण्यात आली. त्याचपद्धतीने खडसे यांना देखील निरोप देण्याची तयारी सुरु असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. खडसे यांना याबाबतची कुणकुण लागल्यामुळेच त्यांनी दीड महिण्यापूर्वी दिल्ली गाठत मोठ्या नेत्यांची भेटी घेतल्याचेही बोलले जात आहे. अर्थात या भेटी विकासकामांसंदर्भात असल्याचे खडसे यांच्यावतीने सांगण्यात आले होते. परंतू ज्या अनुषंगाने खडसे यांचे तिकीट कापले जाण्याची जोरदार चर्चा सुरु झालीय. म्हणूनच ‘धुवां…धुवां…हो रहा हैं समा, कही तो हैं आग लगी’ असेच राजकीय विश्लेषकांना वाटतेय. कुठं तरी, खडसे यांचे राजकीय महत्व कमी केले जात आहे.

 

दुसरीकडे खडसे यांनी भाजपकडून मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघातून उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. एवढेच नव्हे, तर पक्षाच्या स्टार प्रचार म्हणून समावेश असूनही त्यांचे नाव पहिल्या यादीत का नाही? याचा जाब पक्षाला विचारणार असल्याचे खडसे यांनी म्हटले आहे. थोडक्यात खडसे यांना तिकीटासाठी झुरवून त्यांना गुंतवणून ठेवणे. तसेच त्यांचे राजकीय वजन कमी झाल्याचे अधोरेखित करण्यासाठी पक्षांअंतर्गत विरोधकांची ही खेळी असू शकते. थोडक्यात ‘धुवां…धुवां…हो रहा हैं समा, कही तो हैं आग लगी’!, असं म्हणायला देखील जागा आहे.

Protected Content