रावेर-यावल तालुका कुंभार समाजातर्फे दिल्ली सरकारचा निवेदनाद्वारे निषेध

Faizpur news1

फैजपूर, प्रतिनिधी । दिल्ली येथील कुंभार समाजाच्या भट्ट्या बंद केल्याने कुंभार समाजाचा संसार उघड्यावर आला आहे. या घटनेचा आखिल लाड प्रजापती कुंभार समाज संस्था जळगाव संचालित रावेर यावल तालुका कुंभार समाजाकडून दिल्ली सरकारच्या निषेध करण्यात आला. 25 ऑक्टोबर रोजी मुंबईतील जंतरमंतर मैदानावर उपोषणास बसण्याचा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, दिल्ली येथील सरकारने कुंभार समाजाचे उदरनिर्वाह, पोटभरणे जसे म्हणजे माती मडकी, माठ, शिकोऱ्या, दिवे, या मातीपासून बनवणाऱ्या सर्व गोष्टी बनवून भाजण्यात येतात. त्या भट्या बंद करण्यात आल्या. संदर्भात तिथल्या कुंभार समाजाने आपल्या रक्ताने निवेदने सादर केली. 25 ऑक्टोबरला जंतरमंतरवर उपोषणास बसणार आहे. तरी दिल्ली सरकारला जाग येत नाही. त्या लोकांवर उपासमारीची वेळ आली आहेत. अश्या निष्काळजी सरकारचा जाहीर निषेध कुंभार समाजाकडून प्रांत कार्यालय फैजपूर येथे निवेदना द्वारे करण्यात आला. यावेळी समाजाचे युवा सेनाध्यक्ष भरत कापडे व सर्व पदाधिकारी, मनोज कापडे, जिल्हा वीट उदयोजक आघाडी अध्यक्ष घनश्याम हरणकर, सावदा अध्यक्ष किरण कुंभार हे उपस्थित होते.

Protected Content