अत्यावश्यक साधनांच्या उपययोजना करिता यथाशक्ती मदत द्या — प्रांत कडलग

 

 

यावल,  प्रतिनिधी  । कोरोना या  गंभीर आजाराच्या सद्यस्थितीची माहिती देत, येणाऱ्या काळात अत्यावश्यक साधनांच्या उपाय योजनेसाठी (ड्युरा सिलेंडर तसेच कॉन्सन्ट्रेट ऑक्सिजन सिलेंडर ) लोकसहभागातून निधी उभा  करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन प्रांत कैलास कडलग यांनी केले.

ते तालुक्यातील सातपुडा कोवीड सेंटर फैजपूर येथे ५o ऑक्सिजन बेडसाठी लोकसहभागातून निधी संकलन आणि जनजागृती संदर्भातील बैठकीत अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.  या बैठकीला तालुक्यातील विविध क्षेत्रातील दानसुर मंडळी व मान्यवर ,व्यावसायिक ,व्यापारी, पेट्रोल पंप चालक तसेच सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. .

प्रांत  कडलग यांच्या आवाहनाला  प्रतिसाद देत उपस्थितांनी यथाशक्ती आर्थिक मदत केली. संबंधित मतदार संघाचे आमदार यांनी सुद्धा शक्य ती मदत करण्याचे जाहीर केले असल्याचे प्रांत यांनी सांगितले.  विशेष बाब म्हणजे यावल आणि रावेर तहसील कार्यालयातील सर्व महसूल कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी आपला एक दिवसाचा पगार या निधी संकलनासाठी दिला.

दरम्यान बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्दयावर चर्चा झाली. त्यातील काही खालील प्रमाणे फैजपुर प्रमाणे यावल येथे देखील कोरोना रुग्णांसाठी कोविड केअर सेंटरची उभारणी करण्यात यावी कारण  यावल तालुक्यातील पश्चिमेकडे असणाऱ्या गावांसाठी हे प्रशासकीय आणि प्रादेशीक दृष्ट्या सोयीस्कर ठरेल.

आपल्या गावात किंवा परिसरासाठी आपण कोविड-केअर सेंटर  ( विलगीकरण कक्ष) उभारू शकता ,परंतु ही जबाबदारी योग्य पद्धतीने हाताळली जावी आणि लागणाऱ्या सर्व सुविधा तेथे उपलब्ध असाव्यात याची काळजी घेणे गरजेचे असेल असे मत प्रांत कडलग यांनी व्यक्त केलं.

रावेर आणि यावल तालुक्यात असणाऱ्या व्यवसायिक आणि व्यापारी संघटना, पेट्रोल पंप असोसिएशन, शासकीय निमशासकीय संस्थांचे प्रतिनिधी तसेच कर्मचारी ,शिक्षक शिक्षकेतर संघटना, सहकारी संस्था यांनीदेखील यथाशक्ती आर्थिक मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. याप्रसंगी  बैठकीत नायब तहसीलदार आर. डी. पाटील , महसुलचे मुक्तार तडवी यांच्यासह तालुक्यातील विविध समाजीक संस्थांचे पदाधिकारी व दानसुर मंडळी प्रामुख्याने उपस्थित होते.

Protected Content