कांदा निर्यात बंदीविरोधात शिवसेनेतर्फे आंदोलन (व्हिडिओ )

जिल्हाधिकरी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी

शेअर करा !

 

जळगाव, प्रतिनिधी । केन्द्र सरकारच्या कांदा निर्यात बंदी या चुकीच्या धोरणाविरोधात निषेध व्यक्त करत आज जिल्हाधिकरी कार्यालयासमोर शिवसेनेतर्फे जोरदार घोषणाबाजी करून आंदोलन करण्यात आले.

केंद्र सरकारने केलेल्या कांदा निर्यात बंदीच्या विरोधात शिवसेनेतर्फे जोरदार घोषणाबाजी करत यावेळी केंद्र सरकारचा निषेध करून आंदोलन करण्यात आले. कोरोनाच्या महामारीत देशांत आर्थिक संकट ओढवले आहे. यात केंद्र सरकाने कांदा निर्यात बंदी केल्याने कांद्याचा भाव गडगडलेला आहे. कोरोना संकट काळात शेतकऱ्यांना मदत न देता कांदा निर्यात बंदी करून केंद्राने शेतकऱ्यांची अवहेलना केल्याचा आरोप शिवसेना जिल्हाप्रमख गुलाबराव वाघ यांनी करत कांदा निर्यात बंदी मागे घेण्यात यावी अशी मागणी केली.

पंतप्रधानांचा आज वाढदिवस असून आज शेतकरी पंतप्रधान मोदी यांचा निषेध करीत असल्याचे श्री. वाघ यांनी सांगितले. याप्रसंगी शिवसेना महागराध्यक्ष शरद तायडे, राजेंद्र चव्हाण, नितीन सपके, विजय बांदल,जाकीर पठाण, इकबाल शेख, रइस शेख, हेमंत महाजन, प्रकाश पाटील, देवीदास पवार, ओगल पांचाळ, मानसिंग सोनवणे, प्रशांत सुरडकर, योगेश सपकाळे, इश्वर राजपूत, जितू साळुंके, शंतून वानखेडे, जनार्दन सपकाळे आदींची यावेळी उपस्थिती होती.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!