कंपनीचा लोगो लावून कपड्यांची विक्री करणाऱ्यावर पोलीसांचा छापा (व्हिडीओ)

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ब्रॅण्डेड कंपनीचा लोगो वापरून सेल लावून कपडे विक्री करणाऱ्या व्यवसायिकावर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी रामानंदनगर पोलीसांच्या मदतीने छापा टाकला. यात लाखो रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

याबाबत माहिती अशी की, शहरातील हॉटेल रॉयल पॅलेस येथील सभागृहात भाडेतत्वावर दिल्ली येथील कपडे विक्री व्यवसायिकाने सेल लावण्यात आला आहे. दरम्यान, या ठिकाणी वेगवेगळ्या कंपनीच्या बॅण्ड असलेले कपडे विक्रीस आणण्यात आले आहे. यात शर्ट, टीशर्ट, जीन्स पॅन्ट, लेदर बेल्ट, परफ्यूम्स आणि सॉक्स यांचा समावेश आहे. दरम्यान, या ठिकाणी Levi’s या ब्रॅडेड कंपनीच्या लोगो लावून बनावट शर्ट, जीन्स पॅन्ट आणि सॉक्सची विक्री होत असल्याची माहिती Levi’s कंपनीने नेमून दिलेल्या फिल्ड एक्झेक्यूटीव्ह ऑफीसर सचिन गोसावी आणि राकेश राम सावंत यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी पहिल्यांदा विक्रीला आणलेला मालाची चाचपणी केली. दरम्यान, कंपनीचा लोगो लावून कपडे विक्री होत असल्याचे समजल्यानंतर एक्झेक्यूटीव्ह ऑफीसर यांनी रामानंदनगर पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून सोमवारी २५ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास गभाडे, पो.ना. संजय सपकाळे, प्रविण जगदाळे यांनी छापा टाकला. यात शर्ट, जीन्स पॅन्ट आणि सॉक्स बनावट असल्याचे आढळले. त्यानंतर कारवाई करत लाखो रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1014137962641349

 

Protected Content