जिल्ह्यात आतापर्यंत 11 लाख 43 हजार जणांना कोरोना लसीकरण

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आतापर्यंत 11 लाख 43 हजार 465 लाभार्थ्यांना कोरोना लस देण्यात आली आहे. यात 8 लाख 53 हजार 281 जणांना पहिला डोस तर 2 लाख 90 हजार 184 जणांना दुसरा डोस देण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भिमाशंकर जमादार यांनी आज शुक्रवारी 20 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता यांनी पाठविलेल्या पत्रकाद्वारे कळविले आहे. 

जळगाव जिल्ह्यात 15 ठिकाणी प्रमाणात लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व कोरोनापासून बचावासाठी लस महत्वपूर्ण असल्याने आणि जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनास प्रतिसाद दिला आहे. या लसीकरण केंद्रामार्फत जिल्ह्यात आतापर्यंत 8 लाख 53 हजार 281 लाभार्थ्यांना कोरोना लसीचा पहिला डोस तर 2 लाख 90 हजार 184 लाभार्थ्यांना दुसरा डोस असे एकूण 11 लाख 43 हजार 465 लाभार्थ्यांना लसीचे डोस देण्यात आले आहे. यात शहरी भागातील 5 लाख 68 हजार 701 तर ग्रामीण भागातील 5 लाख 74 हजार 764 नागरीकांचा समावेश आहे. नागरीकांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भिमाशंकर जमादार यांनी आज शुक्रवारी 20 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5 वाजता दिलेल्या प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

Protected Content