डॉ. झाकीर हुसैन ऊर्दू हायस्कुलची शिक्षक भर्ती रद्द करण्याबाबत निवेदन

यावल प्रतिनिधी । येथील नॅशनल एज्यूकेशन सोसायटी यावलव्दारे संचलित डॉ. झाकीर हुसैन उर्दू हायस्कूलमध्ये नुकतीच शिक्षक भरतीसंदर्भात घेण्यात आलेली लेखी परिक्षा, मुलाखत पारदर्शक न होता. संचालकांचे नातेवाईकांची भरती होण्यासाठी प्रक्रिया राबविण्यात आली असल्याचा आरोप येथील आबीद खान युनुस खान यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाव्दारे केला असून सदरची करण्यात येत असलेली अनधिकृतरित्या भरती त्वरीत रद्द करण्यात यावी अशी मागणी करणारे निवेदन जिल्हा शिक्षण अधिकारी, राज्याचे राज्य शिक्षणमंत्री बच्चू कडू व शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना देण्यात आले आहे.

आबीद खान युनुस खान यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की नॅशनल एज्यूकेशन सोसायटी यावल व्दारे संचलित डॉ.झाकीर हुसैन उर्दू हायस्कूलमध्ये शिक्षक भरतीसाठी काढण्यात आलेली जाहिरात केवळ संस्था संचालकांच्या नातेवाईकांच्या भरतीसाठी काढण्यात आली. मुलाखतीसाठी संचालकाचे जे काही नातेवाईक उपस्थित होते त्यांचे टीईटी प्रमाणपत्राची चौकशी होणे गरजेचे आहे. लेखी पश्नपत्रिकेची छायांकित प्रत, व उत्तरपत्रिका संचालकांचे नातेवाईकांसाठी उपलब्ध करण्यात आली होती. वास्तविक या मुलाखतीसाठी उपस्थित असलेल्या हुशार, मेहनती, गरीब, व गरजूंवर अन्याय झाला असून, या अनधिकृत नोकरभरतीची प्रक्रिया रद्द करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. संस्थेत घेण्यात आलेली नोकरभरतीसंदर्भातील प्रकिया पारदर्शक पध्दतीने झाली असून संबंधित व्यक्तीचा आरोप निराधार आहे. नोकरभरतीसंदर्भात अजून प्रत्यक्ष नियुक्ती पत्र देण्यात आलेले नाही.

शहरातील डॉ. झाकीर हुसेन उर्दू हायस्कूलमध्ये नुकतील शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्यात आली. यात लेखी परिक्षा, मुलाखत हे पारदर्शक न होता संचालकांचे नातेवाईकांची भरती राबविण्यात आली असून ही बेकायदेशीर केलेली भरती रद्द करण्यात यावी अशी मागणी आदीब खान व युनुस खान यांनी आज शुक्रवार २० ऑगस्ट रोजी शिक्षणाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील नॅशनल एज्यूकेशन सोसायटी संचलित डॉ.झाकीर हुसैन उर्दू हायस्कूलमध्ये शिक्षक भरतीसाठी काढण्यात आलेली जाहिरात केवळ संस्था संचालकांच्या नातेवाईकांच्या भरतीसाठी काढण्यात आली. मुलाखतीसाठी संचालकाचे जे काही नातेवाईक उपस्थित होते त्यांचे टीईटी प्रमाणपत्राची चौकशी होणे गरजेचे आहे. लेखी पश्नपत्रिकेची छायांकित प्रत, व उत्तरपत्रिका संचालकांचे नातेवाईकांसाठी उपलब्ध करण्यात आली होती. वास्तविक या मुलाखतीसाठी उपस्थित असलेल्या हुशार, मेहनती, गरीब, गरजूंवर अन्याय झाला आहे. त्यामुळे अनधिकृत नोकरभरतीची प्रक्रिया रद्द करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, या संदर्भात डॉ. झाकीर हुसेन उर्दू हायस्कूलचे प्राचार्य जी.एन. खान यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले की, संस्थेत घेण्यात आलेली नोकरभरतीची प्रकिया पारदर्शक पध्दतीने झाली असून संबंधित व्यक्तीचा आरोप निराधार आहे. नोकरभरतीसंदर्भात अजून प्रत्यक्ष नियुक्ती पत्र देण्यात आलेले नाही असे ते म्हणाले.

 

 

 

Protected Content