पाचोऱ्यात शिवसेना व काँग्रेसचे एकदिवशीय धरणे आंदोलन (व्हिडीओ )

पाचोरा प्रतिनीधी । केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायदे रद्द व्हावेत यासाठी दिल्ली येथे सुरु असलेल्या देशव्यापी आंदोलनास पाठींबा म्हणुन तहसिल कार्यालयासमोर पाचोरा शिवसेनेतर्फे एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. 

केंद्र सरकारने नुकतेच देशातील शेतकऱ्यांच्या विरोधात ३ कायदे आपल्या पाशवी बहुमताच्या जोरावर मंजुर केले आहेत. सदरच्या कायद्यामुळे सामान्य शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार असुन, अल्पभुधारक शेतकरी यामध्ये भरडुन निघणार आहेत. या कायद्यांना केंद्र सरकारने मागे घ्यावे यासाठी दिल्ली जवळ देशभरातील शेतकरी संघटना व शेतकरी एकवटुन गेल्या ८ दिवसांपासुन आंदोलन करीत आहेत. मात्र या सरकारला शेतकऱ्यांच्या हिताविरुध्द भांडवलदारांचे घर भरण्यात आनंद आहे. त्याचा निषेध म्हणुन तसेच केंद्र सरकारने तातडीने सदरील तिन्ही कायदे तातडीने मागे घ्यावेत या मागणीसह पाचोरा तालुका शिवसेना – युवासेना, महिला आघाडी, शेतकरी सेना, पाचोरा शहर काँग्रेसपार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी आज ३ डिसेंबर रोजी सकाळी १०:०० वाजेपासुन दुपारी १ वाजेपर्यंत तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी ही केली.

यावेळी नगराध्यक्ष संजय गोहिल, उपनगराध्यक्ष शरद पाटे, सेनेचे जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील, पदमसिंग पाटील, उपजिल्हा प्रमुख अॅड. अभय पाटील, माजी उपजिल्हा प्रमुख गणेश पाटील, शेतकरी सेना जिल्हा प्रमुख अरूण पाटील, उद्धव मराठे, शिवदास पाटील, नाना वाघ, जितेंद्र पेंढारकर, वैभव राजपुत, पाचोरा शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅड. अमजद पठाण, आरोग्य सेलचे जिल्हाध्यक्ष सचिन सोमवंशी, सरचिटणीस प्रताप पाटील, अॅड. अविनाश भालेराव, नंदकुमार सोनार, जिल्हा सचिव इरफान मणियार, माजी सरचिटणीस संगिता नेवे, माजी तालुका अध्यक्ष्या कुसुम पाटील, शरीफ बागवान, अॅड. मनिषा पवार, शिवसेनेचे पाचोरा तालुकाध्यक्ष शरद पाटील, शहराध्यक्ष किशोर बारवकर, युवासेना जिल्हा समन्वयक सुरेश पाटील व महिला आघाडी तालुका प्रमुख मंदा पाटील, विठ्ठल गुंजाळ सह शिवसेना व काॅंग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील व तहसिलदार कैलास चावडे यांना उपस्थितांतर्फे निवेदन देण्यात आले.

Protected Content