धरणगाव तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन

धरणगाव प्रतिनिधी । मोदी शासनाने कृषी व शेतकरी संदर्भात पारित केलेल्या तीन काळ्या कायद्याच्या विरोधात देशातील शेतकरी वर्ग निदर्शने व आंदोलन करीत आहे. या संदर्भात दिल्लीच्या सीमेवर देशातील शेतकऱ्यांनी फार मोठे आंदोलन उभे केलेले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी धरणगाव तालुका काँग्रेस कमिटी तर्फे धरणगाव तहसील येथे धरणे आंदोलन करण्यात आले.

याप्रसंगी प्रदेश काँग्रेसचे सचिव डी. जी. पाटील, रामभाऊ पाटील, तालुकाध्यक्ष रतिलाल चौधरी, शहराध्यक्ष राजेंद्र न्यायदे ,शेतकी संघाचे चेअरमन  निळकंठ पाटील , तालुका उपाध्यक्ष चंदन पाटील, माजी नगराध्यक्ष अरुणा कंखरे ,दीपक जाधव ,महेश पवार गोपाल पाटील डॉक्टर व्हि. डि. पाटील रामकृष्ण पाटील ,युवक शहराध्यक्ष, गौरव चव्हाण, प्रमोद जगताप , योगेश येवले बापू जाधव, गुलाब पाटील, गोकुळ पाटील, राहुल मराठे, सुनील  बडगुजर, दीपक मराठे, काँग्रेस पदाधिकारी , कार्यकर्ते, व शेतकरी उपस्थित होते.

 

 

 

Protected Content