एमपीएससीच्या आंदोलक विद्यार्थ्यांच्या भेटीला शरद पवार

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेची तयारी करणार्‍या आंदोलक विद्यार्थ्यांची राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भेट घेऊन त्यांची मागणी पूर्ण करण्याची ग्वाही दिली.

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी यंदाच्या वर्षापासून सुरू करण्याचा निर्णय अद्याप बदललेला नसल्याच्या विरोधात पुण्यात विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. याच आंदोलक विद्यार्थ्यांची काल रात्री उशिरा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी भेट घेतली. त्यांनी आंदोलक विद्यार्थ्यांशी वार्तालाप केला.

यावेळी शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी आंदोलनस्थळावरून फोनवर संवाद साधला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी प्रश्न सोडविण्यासाठी बैठक घेण्यास तयार असल्याचं म्हटले. सरकारला विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडवावाच लागले. यासाठी मी स्वत: विद्यार्थ्यांसोबत येणार असल्याचं म्हटलं. यावर मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांतच बैठक घेण्याचं मान्य केलं. विद्यार्थ्यांकडून देखील पाच प्रतिनिधींची नावे शरद पवार यांनी देण्यात आली. मात्र आयोगाने नोटीस जोपर्यंत निघत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचं विद्यार्थ्यांनी स्पष्ट केलं आहे. याप्रसंगी कॉंग्रेसचे नेते अतुल लोंढे हे देखील उपस्थित होते.

Protected Content