अल्पसंख्याक सेवा संघाचे महापालिकेसमोर धरणे आंदोलन !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव महापालिकेसमोर अल्पसंख्याक सेवा संघाचे विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात येत आहे. शाहू नगर परिसरातील नागरीकांना नागरी सुविधा मिळाव्यात अशी मागणी केली आहे. जळगाव महापालिका याकडे दुर्लक्ष करीत असल्याने अखेर मंगळवारी १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता स्थानिक रहिवाशी यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव शहरातील शाहूनगर परिसर हा मुख्य प्रभाग असून स्थानिक भागात अनेक वर्षांपासून नागरी सुविधा देण्यास महापालिका असमर्थ ठरत आहे. या भागातील रहिवाशी हे महापालिकेचा कर भरत असूनही या प्रभागाकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे. स्थानिक नगरसेवक देखील याकडे दुर्लक्ष करत आहे. या प्रभागात निवडून आलेले नगरसेवक दोन वेळा निवडून आलेले आहे. परंतू नागरी सुविधा संदर्भात तक्रार केल्यावर देखील प्रभागात येत नाही. दरम्यान, शाहू नगर परिसरात नागरी सुविधा मिळाव्यात अन्यथा मतदाता स्थानिक नगरसेवकांना घरा रस्ता दाखविल्याशिवाय राहणार नाही. महापालिका प्रशासन आणि स्थानिक नगरसेवक याकडे साफ दुर्लक्ष करीत याच्या निषेधार्थ अल्पसंख्यांक सेवा संघाच्या वतीने महापालिकासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची दखल न घेतल्यास भविष्यात बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

याप्रसंगी अल्पसंख्यांक सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष जहांगिर खान, उपाध्यक्ष याकुब खान, जिल्हा महिलाध्यक्ष आयशाबी मन्यार, महानगराध्यक्षा हुसेन खान, जिल्हा उपाध्यक्ष अकबर काकर, वसीम शेख, मुस्तकीन खान, जाफर भिस्ती, इक्रोमोद्दिन जलालोद्दीन, बादशाह खान, शाहरूख खान यांच्यासह स्थानिक नागरीक उपस्थित होते.

Protected Content