यावल शहरात मराठा समाजाचा मोर्चा

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराठी तालुका अबंड येथे मागील पाच दिवसापासून मराठा समाजास आरक्षण मिळावे, या मागणीसाठी १ सप्टेंबरपासून या गावात मनोज पाटील यांच्या शांतताप्रिय मार्गाने उपोषणास सुरू असतांना पोलीसानी केलेल्या अमानुषपणे लाठीमार व गोळीबार केल्याने अनेक आंदोलनकर्ते जखमी झाले. या घटनेच्या निषेधार्थ  यावल येथे मराठा समाजाच्या वतीने तहसीलदार मोहनमाला नाझिरकरयांना निवेदन देण्यात आले.

यावल शहरातील सकल मराठा समाजाच्या वतीने यावल शहरातून मोर्चा काढण्यात आला. सोमवारी  ४ सप्टेंबर रोजी २०२३ रोजी सकाळी ११ वाजता यावल सहकारी खरेदी विक्री संघातुन सकल मराठा समाजाच्या वतीने मोर्चाला सुरूवात करण्यात आली.  यात समाजाच्या वतीने अतुल पाटील ,प्रा. मुकेश येवले , अजय पाटील ,उमाकांत पाटील ,देवीदास धांगो पाटील,अनिल साठे ,अॅड देवकांत पाटील, पवन पाटील , वसंत पाटील , विलास चंद्रभान पाटील , नानाजी प्रेमचंद पाटील ,डी सी पाटील , डॉ हेमंत येवले,डी बी पाटील , सुनिल गावडे ,महेश पाटील यांच्यासह शेकडो मराठा समाज बांधवांनी यात आपला सहभाग नोंदविला .

Protected Content