मुलीसोबत बोलण्यावरून तरूणावर विळ्याने वार

फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील न्हावी येथील धनगर वाडा येथे मुलीसोबत बोलण्याच्या कारणावरून तरूणावर लोखंडी विळ्याने वार करून जखमी केल्याची घटना घडली आहे. याबाबत फैजपूर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

फैजपूर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र अनिल तळेले (वय-२३) रा. बोरखेडा ता. यावल हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतो. १२ जून रोजी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास जितेंद्र तळेले हा न्हावी येथील धनगर वाड्यात उभा असतांना मयूर उर्फ डिगंबर जनार्दन तळेले रा. न्हावी ता. यावल याने जवळ येवून मुलीशी का बोलतो ? असा जाब विचारून शिवीगाळ केली आणि हातातील लोखंडी विळा जितेंद्रच्या मानेवर टाकल्याने गंभीर दुखापत केली. जखमी झालेल्या जितेंद्रला तातडीने यावल ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आले. याबात जितेंद्र तळेले यांच्या फिर्यादीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी मयूर उर्फ डिगंबर जनार्दन तळेले रा. न्हावी ता. यावल याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सिध्देश्वर आखेगावकर करीत आहे.

Protected Content