जिल्हा हादरला : चिमुकल्यासह आईने घेतला गळफास

अमळनेर तालुक्यातील शिरूड येथील घटना; आत्महत्या करण्याचे कारण अस्पष्ट

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील शिरूड येथे आईने मुलासह गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीला आली आहे. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.

 

पुर्वी सोनवणे आणि वृषांत सोनवणे असे मयत माय लेकाचे नाव आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील‍ शिरूड येथील माहेर असलेल्या पुर्वी सोनवणे याचे कौटुंबिक वाद असल्याने त्या मुलगा वृषांत यांच्यासोबत माहेरी शिरूड येथे आईवडीलांकडे वास्तव्याला होत्या. दरम्यान मध्यरात्री त्यांनी मुलाला गळफास देवून स्वत: गळफास घेवून आत्महत्या केली. शुक्रवार १७ जून रोजी सकाळी पुर्वी सोनवणे यांचे वडील वसंत पाटील हे वरच्या मजल्यावर गेले असता मुलीने मुलासह आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. मुलीसह नातवाचा मृतदेह पाहून त्यांनी आक्रोश केला. शेजारी राहणाऱ्या नातेवाईक व ग्रामस्थांनी धाव घेतली होती. महिलेने सुसाईड नोट लिहून आत्महत्या केल्याचे समजते. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!