मुक्ताईनगरमध्ये पुन्हा पाणीटंचाई; नागरिक संतप्त

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुक्ताईनगर मध्ये कित्येक महिन्यापासून सुरू असणारा पाणीपुरवठा हा सुरळीत नव्हता अवघ्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा सुरळीत झाल्यावर सुद्धा पूर्णा नदीला गाळ मिश्रित पूर आल्यामुळे पाणीपुरवठा पुन्हा ठप्प झाल्याचे नगरपंचायत तर्फे कळविण्यात येत आहे.

नगरपंचायत तर्फे मुक्ताईनगर शहरांमध्ये दवंडी फिरवून पाणीटंचाई बाबत नागरिकांना सूचना देण्यात येत आहे. सुरळीत झालेला पाणीपुरवठा इतक्या लवकर ठप्प होईल याची नागरिकांना जाणीव नव्हती. नागरिकांनी पाण्याचा वापर कमी प्रमाणात करावा आणि पिण्याची पाणी गाळून उकळून प्यावे असे नगरपंचायतच्या दवंडी तर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. मुक्ताईनगर शहरवासीयांना समस्या भरपूर येत असतात कधी दिलासा मिळेल याची नागरिक विचारणा करत आहे.

Protected Content