राष्ट्रीय महामार्गावरील दुभाजक बनले मोकाट गुरांचे आश्रयस्थान

पहूर ता .जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर पहूर बस स्थानकावरील दुभाजक मोकाट जनावरांचे आश्रयस्थान बनले असून वाहनचालकांसह शेतकरी बांधवांना या मोकाट गुरांचा मोठा त्रास होत आहे . मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी नेमकी कोणाची ? असा सवाल सामान्य नागरिक विचारत आहेत. पहूर परिसरात सुमारे ५० ते ६० मोकाट गुरे जनावरे शेत शिवारासह गावात महामार्गावर भटकंती करत असतात . काही गुरे चक्क महामार्गावरील दुभाजकाचाच आश्रय घेताना दिसून येत आहेत.

मोकाट जनावरांमुळे शेत शिवारात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याच्या तक्रारी वीरेंद्र संचालन लोढा यांच्यासह शेतकऱ्यांनी पहूर कसबे ग्रामपंचायत ,पहूर पेठ ग्रामपंचायतीस दिलेल्या आहेत . तक्रार अर्ज देऊन आठ दिवस उलटून गेले असले तरी अजून मात्र कोणतीही कारवाई ग्रामपंचायतीने केलेली नाही .
पहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सानप यांनीही या संदर्भात ग्रामपंचायतींशी वेळोवेळी पत्रव्यवहार केल्याचे सांगितले . मात्र नेमकी मोकाट गुरांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी कोणाची असा प्रश्न उपस्थित होत आहे. बस स्थानक परिसरात गुरे इतरत्र फिरतात. आता तर चक्क महामार्ग दुभाजकावरच त्यांनी ठाण मांडल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे . शेत शिवारातील गुरांचा उपद्रव टाळण्यासाठी सुस्तावलेल्या संबंधित यंत्रणेने जागे होण्याची गरज आहे .

Protected Content