पाचोराकर कविता पाटीलांची वनपालपदी पदोन्नती

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | वन विभागात कार्यरत असलेल्या कवित शैलेश पाटील रा. बांबुरुड खु” (महादेवाचे) यांना वन विभागात वनपाल म्हणून पदोन्नती मिळाली असुन आपल्या चांगल्या कर्तृत्वाने त्यांना ही पदोन्नती मिळाली आहे.

कविता पाटील ह्या सन २०१० मध्ये वन विभागात वन रक्षक म्हणून कार्यरत झाल्या होत्या. त्यांचे आपल्या कामावर असलेले प्रभुत्व याच्या जोरावर त्यांची वनपालपदी पदोन्नती मिळाली आहे. कविता शैलेश पाटील यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन व कौतुक केले जात आहे. कविता पाटील ह्या रेल्वे पोलिस दिनेश पाटील यांच्या मेहुण्या आहेत.

Protected Content