रावेरात जप्त केलेल्या ट्रॅक्टरच्या मालकांना दंडाची नोटीस : चर्चेला उधाण

रावेर प्रतिनिधी ।  रावेर तहसीलने जप्त केलेल्या चार ट्रॅक्टरना दंड भरण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, प्रत्येकी ट्रॅक्टर मालकाला १,११,५०० रुपये दंड भरण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती तहसील प्रशासनाने प्रसारमाध्यमांना दिली.

रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी आपल्या पथकासह मोरगाव-खिरवळ नदी पात्र नाल्यात जाऊन चार गौण खनिज टॅक्टर पकडले होते. यामुळे एकच खळबळ उडाली होती. सर्व टॅक्टर पोलिस बंदोबस्तात रावेर तहसिलमध्ये आणले होते. अखेर आज चारही टॅक्टरांना दंड भरण्याच्या नोटिसा बजावण्यात आले आहे.

Protected Content