‘एक थेंब अमृताचा’ मोहिमेस प्रारंभ

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील फैजपूर येथे एक थेंब अमृताचा मोहीम सुरू झाली असून याच्या अंतर्गत लोक सहभागातून जलसंवर्धन करण्यात येणार आहे.

आमदार हरिभाऊ जावळे यांच्या पुढाकाराने लोकसहभागातून जलक्रांती अभियानास मसाकाच्या परिसरात जलपूजन व यंत्र पूजनाने प्रारंभ करण्यात आला. प्रास्तविकात आमदार जावळे यांनी, यावल-रावेरमधील ११ नद्यांमध्ये दोन महिने संत-महंतांचे मार्गदर्शन व लोकसहभागातून जलसंधारणाची कामे करण्यात येणार असल्याची माहिती दिली. याप्रसंगी माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे, आमदार हरीभाऊ जावळे, माजी आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार रमेश चौधरी, महामंडलेश्‍वर जनार्दन महाराज, धनराज महाराज, मौलाना हाफीस अनस, भंते अरण्य महानाम, कन्हैया महाराज, जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे, मसाका चेअरमन शरद महाजन, जलतज्ज्ञ व्ही.डी.पाटील, सभापती माधुरी नेमाडे, पल्लवी चौधरी, जामनेरच्या नगराध्यक्षा साधना महाजन, महानंदा होले, सुरेखा कोळी उपस्थित होते. प्रा.डॉ.जतीन मेढे यांनी सूत्रसंचालन, तर डॉ.के.जी.पाटील यांनी आभार मानले.

Add Comment

Protected Content