संगांयो अनुदान तात्काळ मंजूर करा; राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील संजय गांधी योजनेअंतर्गत मिळणाऱ्या विविध अनुदानाच्या लाभासाठी शेकडो लाभार्थ्यांचे प्रस्ताव हे मागील अनेक दिवसांपासुन प्रलंबीत आहे. प्रशासनाने प्रलंबित प्रस्ताव व प्रकरणे तातडीने मंजूर करावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यावल तालुक्यातील गोरगरीब व आदीवासी गरजु नागरीकांनी मागील काही दिवसांपासुन समितीच्या माध्यमातुन लाभ मिळावा याकरिता संजय गांधी निराधार योजना समितीची कडे अर्ज दाखल केले आहे. त्या अर्जांचा बैठकीत तात्काळ निर्वाळा करायात यावा अशा मागणीचे निवेदन दिले आले. यावल तालुका संजय गांधी निराधार योजना समिती या योजनेअंतर्गत मिळणारे संजय गांधी , इंदीरा गांधी भुमिहीन , श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांची मार्च २०२२ पासून शासन बद्दल झाल्याने बैठक न झाल्यामुळे नवीन लाभार्थ्यांची मंजुरी न मिळाल्यामुळे नवीन लाभार्थ्यांना अनुदान मिळत नसून ते अनुदानापासून वंचित राहत आहेत तरी या निराधार असणाऱ्या लोकांना विधवा, ज्येष्ठ नागरिक, अपंग यांचा समावेश असतो. त्यामुळे बैठक घेवून प्रलंबित प्रकरणे तातडीने मंजूर करण्यात यावे अशी मागणीचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक तालुकाध्यक्ष ॲड. देवकांत पाटील, शहराध्यक्ष हितेश गजरे, राष्ट्रवादीचे समन्वयक किशोर माळी, सरचिटणीस हेमंत दांडेकर, संघटक शब्बीर खान आदींची उपस्थिती होती.

Protected Content