जय संघर्ष वाहन चालक-मालक संघटनेच्या जिल्हा अध्यक्षपदी योगेश पाटील

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्यातील जय संघर्ष वाहन चालक मालक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी योगेश पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

या नियुक्तीपत्र संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण वाघ व इतर पदाधिकरी यांच्या उपस्थित पत्र देण्यात आले. याप्रसंगी मुक्ताईनगर अध्यक्ष योगेश कपले, रुग्णवाहिका शहराध्यक्ष प्रमोद खडसे, मुक्ताईनगर तांत्रिक सल्लागार पियूष पाटील यांची सुद्धा नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना संस्थापक अध्यक्ष संजय हाळनोर, प्रदेशाध्यक्ष प्रवीण वाघ यांनी भावी वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या. हा कार्यक्रम म्हसावद येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांची निवड करण्यात आली.

Protected Content