यावलसह तालुक्यात वाळूची अवैध वाहतूक ;  वाळू तस्करांवर कारवाईची मागणी 

 

यावल, प्रतिनिधी शहरासहतालुक्यात वाळू माफियांनी धुमाकूळ घातलेला असतांना महसुल प्रशासन निद्रित अवस्थेत दिसत आहे. महसुलच्या वरीष्ठ पातळीवर या अवैध  मार्गाने वाळू तस्करी करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई  व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे.

या संदर्भातील माहीती अशी की, यावल तालुक्यात व ग्रामीण भागासह परिसरात वाळु माफीयाने आपले जाळे पसरविले आहे. तालुक्यात व शहरात अनेक ठिकाणी  अवैद्य मार्गाने उपसा करून साठवण करून ठेवलेल्या वाळुची छुप्या मार्गाने प्रतिदीन सुमारे २५ ते ३० ट्रॅक्टरद्वारे अवैध मार्गाने वाळुची मोठया प्रमाणावर वाहतुक करण्यात येत आहे.  यासर्व गैरकारभारावर स्थानीक महसुल प्रशासन हेतुपुरस्पर दुर्लक्ष करण्यात येत असल्याची तक्रार नागरीकांकडुन करण्यात येत आहे.  या वाळू माफियांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या राजकीय पुढाऱ्यांचा देखील पाठींबा मिळत असल्याचे बोलले जात असून या अवैधरित्या परिसरातील नद्यांची व तापी नदीची वाळू उपसा करून बेकाद्याशीररित्या वाहतुक करणाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही व्हावी अशी मागणी निसर्गप्रेमींकडुन होत आहे.

Protected Content