चार वर्षाच्या मुलाचे अपहरण !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगर पालिकेच्या शेजारी असलेल्या रोडवरून एका चार वर्षाच्या चिमुकल्याचे अपहरण केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सोमवारी ५ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता शहर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरात गणेशोत्सव असल्याने शहरातील महापालिकेच्या आवारात किरकोळ खेळणी व फुगे विक्रेत्यांनी दुकाने लावलेली आहेत. दरम्यान कोपरगाव अहमदनगर येथील महिला शबाना सलमान चव्हाण यांनी देखील फुगे विक्रीचे दुकान लावलेले आहे. या महिलेसोबत तिचा चार वर्षाचा मुलगा आयुष देखील आहे. रविवारी ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास महिला जळगाव महापालिकेच्या आजूला असलेल्या गल्लीत फुगे विक्री करत असतांना तिच्या नातेवाईकाच्या मुलासोबत तिचा मुलगा आयुष देखील खेळत होता. दरम्यान, आयुष तिला खेळतांना दिसून आला नाही. यापुर्वी शबाना चव्हाण हिचा तिचे नातेवाईक नितीन लाला भोसले यांच्याशी दुकान लावण्याच्या जागेवरून वाद झाला होता. त्यानेच मुलाचे अपहरण केल्याची तक्रार शबाना चव्हाण यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. सोमवारी ५ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता शहर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी नितीन लाला भोसले रा. कोपरगाव जि.अहमदनगर यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव क्षिरसागर करीत आहे.

 

 

Protected Content