किरकोळ कारणावरून शेतकऱ्याला मारहाण !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेतातील रस्त्यावरून बैलगाडी व गोण्या बाजूला करण्याच्या कारणावरून शेतकऱ्याला तीन जणांनी मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना तालुक्यातील विटनेर शिवारात घडली आहे. यासंदर्भात सोमवारी ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अरूण मुरलीधर नावडे (वय-४५) रा. विटनेर ता.जि.जळगाव हे शेतकरी करून शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. सोमवारी ५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता अरूण नावडे हे विटनेर शिवारातील त्यांच्या शेतात रस्त्याने जात होते. रस्त्यावर शाम अमृत धोबी यांची बैलगाडी व काही गोण्यासह इतर सामान रस्त्यावर पडलेला होता. अरूण नावडे यांनी बैलगाडी व सामान बाजूला करा असे सांगितले. याचा राग आल्याने शाम अमृत धोबी, दामू अमृत धोबी आणि संगिताबाई अमृत धोबी तिघे रा. विटनेर ता.जि.जळगाव यांनी अरूण नावडे याला शिवीगाळ करून मारहाण केली. यात एकान काठीने डोक्यावर मारून अरूणला दुखापत केली. याबाबत सायंकाळी ५ वाजता अरूण नावडे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार राजेंद्र उगले करीत आहे.

Protected Content