महाराष्ट्रात सीप्लेन विमाने सुरु होणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । महाराष्ट्रात मुंबई ते शिर्डीसह लोणावळा आणि गणपतीपुळे यांसारख्या प्रसिद्ध पर्यटनस्थळांवर सीप्लेन विमानसेवा सेवा सुरु केली जाणार आहे

सीप्लेनमधून प्रवास करणे हा हवाई प्रवासाचा एक वेगळाच अनुभव आहे. नदी किंवा समुद्रातून होणारं विमानाचं उड्डाण अंगावर काटा उभा करतं. हा अनुभव सध्या भारतात अहमदाबाद ते केवडिया या मार्गावर सुरु आहे. आता महाराष्ट्रासह देशभरात अशी सेवा सुरु होणार आहे. केंद्र सरकार यावर काम करत आहे.

देशातील पहिल्या सीप्लेन सेवेचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑक्टोबर २०२० मध्ये केलं होतं ही सेवा अहमदाबादच्या साबरमती नदीकिनाऱ्यावरुन केवडिया दरम्यान आहे. आता आगामी काळात दिल्ली-युमना रिव्हर फ्रंट-अयोध्या, मुंबई-शिर्डीसह अनेक मार्गांचा विचार सुरु आहे.

केंद्र सरकारच्या जलपरिवहन मंत्रालयाने जलवाहतूक सेवेसाठी कंपन्यांचे प्रस्ताव मागवले आहेत. यात दिल्लीच्या यमुना नदी किनाऱ्यापासून अयोध्या, टिहरी, श्रीनगर (उत्तराखंड) आणि चंडीगड, मुंबई ते शिर्डी, लोणावळा आणि गणपतीपुळे, सूरत ते द्वारका, मांडवी आणि कांडलासह अंदमान आणि निकोबार, लक्षद्वीप समुहासाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. इच्छुक कंपन्यांना २२ जानेवारीपर्यंत प्रस्ताव सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

. दिल्लीहून अयोध्या, टिहरी, श्रीनगर (उत्तराखंड) तेथून पुढे बद्रीनाथ-केदारनाथ आणि चंडीगडपर्यंत तेथून पुढे डलहौजीसह हिमाचल प्रदेश आणि पंजाबमधील अन्य पर्यटनस्थळांवर आणि मुंबईहून शिर्डी, गणपतीपुळे, लोणावळा आणि इतर पर्यटनस्थळांसाठी.त्याचप्रमाणे सूरतहून द्वारका, मांडवी आणि कांडलापर्यंत.ही सेवा विचाराधीन आहे

अहमदाबाद रिव्हर फ्रंटवरुन केवडियापर्यंत सी-प्लेन सेवा देणारी कंपनी स्पाईसजेट ही आहे. यासाठी स्पाईसजेटने 15 आसनव्यवस्था असलेलं ट्विन ओटेर 300 एअरक्राफ्टची व्यवस्था केली आहे. हे विमान जगभरात सर्वाधिक उपयोगी मानलं जातं. हे विमान त्यांच्या वेगळेपणासाठी आणि सुरक्षिततेसाठी देखील ओळखलं जातं. या विमानाची बनावट, पेलोड क्षमता, शॉर्ट टेक ऑफ या गोष्टी देखील विशेष आहेत. आगामी मार्गावरील सेवेसाठी देखील सरकारने याच प्रकारची सेवा देण्याबाबत प्रस्ताव मागितले आहेत.

Protected Content